याचिका मागे घेतल्याने पायलट गटाला दिलासा
राजस्थानच्या सत्तासंघर्षाचा खेळ न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही सुरू आहे. राजस्थान हायकोर्टाचा परिस्थिती कायम राखण्याच्या निर्णयाविरोधात विधानसभा अध्यक्ष सी पी जोशींकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, अतिशय नाट्यमयरित्या सकाळी 11.00 वाजता सुनावणी सुरू होण्याआधीच विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांनी आपल्या याचिकेवर यू-टर्न घेत आपली याचिका परत घेतलीय. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच याचिका मागे घेऊन राजस्थान प्रकरणी राजकीय लढाई लढावी, अशी काँग्रेसमधील काही नेत्यांनी भावना व्यक्त केली होती. त्यामुळे सुनावणीपूर्वीच जोशी आपल्या याचिकेवर ’यू-टर्न’ घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. विधानसभा अध्यक्षांनी याचिका परत घेतल्यानं सचिन पायलट गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.